श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री


श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री


डॉ. राजगोपाल देवरा, भा.प्र.से.
अपर मुख्य सचिव (सहकार व पणन)


श्री. कौस्तुभ दिवेगावकर, भा.प्र.से.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

423423 -A A +A English

गोदाम सेवा

About Us

गोदामांची बांधकामे:

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळला इतर संस्थांसाठी नाममात्र पर्यवेक्षण / Centage शुल्कासह गोदाम बांधुन देते. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळा ने यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाला अशा सेवा पुरवल्या आहेत.

सल्लागार सेवा पुरवणे:

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आधुनिक गोदाम उभारणी /बांधकामासाठी सल्लागार म्हणून सेवा प्रदान करते, तसेच ते अन्नधान्याच्या शास्त्रीय पद्धतीने साठवणूकी बाबत आवश्यक सल्ला देते.

शास्त्रशुद्ध साठवणुक सुविधा:

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ सर्व प्रकारचे कृषी उत्पादने , औद्योगिक कच्चा माल, औद्योगिक तयार वस्तू आणि विविध नाशवंत माल आणि इतर अधिसूचित वस्तूंसाठी संपूर्ण महाराष्ट्रात २०५ विविध केंद्रांच्या ठिकाणी शास्त्रशुद्ध साठवण सुविधा उपलब्ध करुन देते. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळचे द्रोणागिरी नोड येथे कंटेनर फ्रेट स्टेशन(CFS) कार्यरत असून तेथे आयातनिर्यात सुविधा पुरवली जाते. या व्यतिरिक्त, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आयात वस्तू साठवणूकी करिता शुल्कबंध गोदामाची सुविधा सुध्दा पुरवते.

हाताळणी व वाहतूक सुविधा:

ठेवीदारांनी विनंती केल्यास वखार महामंडळाच्या कामाचा एक भाग म्हणून प्रमुख ठेवीदारांना हाताळणी व वाहतूक सेवा प्रदान केली जाते. हाताळणी व वाहतूक सेवेमध्ये खालील घटकांचा समावेश असतो:
१. रेल्वे धक्क्यावर रेल्वे वॅगनमधून माल उतरवणे आणि ट्रकमध्ये भरणे.
२. मालधक्यापासून गोदामांपर्यंत मालाची वाहतूक करणे.
३. ट्रक मधून माल उतरवून तो गोदामात थप्पी लावणे.
४. मालाचे जावक देण्याकरिता गोदामातील साठा ट्रक मध्ये भरणे.

साठवलेल्या मालाचे 100 % विमा संरक्षण:

जोखीम हस्तांतरण धोरणाचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांकडून विमा पॉलिसी प्राप्त केलेली आहे, ज्यामध्ये गोदाम इमारत आणि गोदामांमध्ये साठवलेला मालाचा समावेश असतो. सर्व गोदामांना आग, दंगल, संप, हरताळ आणि घातपाता मुळे होणारे नुकसान, (आरएसएमडी) तसेच वादळ, चक्रीवादळ ,महापूर, (एसटीएफआय) यासर्वापासून विमा संरक्षण आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने ०१/०७/२०२१ ते ३०/०६/२०२२ च्या कालवधीसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी कडून विमा पॉलिसी घेतल्या आहेत. या पॉलिसींचे वेळोवेळी नूतनीकरण केले जाणार आहे. सदर विमा पॉलिसींमध्ये गोदामात साठवीलेला माल (स्टॉक), गोदाम इमारत, कस्टम ड्यूटी, डेटा सर्व्हर, कॉम्प्युटर आणि इतर संबंधित उपकरणे, इत्यादींचा समावेश आहे.

कीड नियंत्रण सेवा:

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कीड नियंत्रण सुविधा सुद्धा पुरवते. यात अॅल्युमिनियम फॉस्फाईड गोळ्या मालाच्या थप्पीवर आणि मालाच्या चहुबाजूंनी पसरवून ठेवल्या जातात जे कीटकांसाठी प्राणघातक ठरतात. हाय डेनसीटी पॉलिथीन कव्हर्स(HDPE) अन्नधान्याच्या थप्पींवर आच्छादन करुन धुरीकरणासाठी वापरले जाते. धुरीकणाचा जास्तीत जास्त प्रभावासाठी वाळूभरलेल्या पिशव्या( Sand Snakes) यांचा वापर करुन संपुर्ण धान्याची थप्पी हवाबंद केली जाते.