श्री. एकनाथ शिंदे
माननीय मुख्यमंत्री


श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय उपमुख्यमंत्री


श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री


श्री. अब्दुल सत्तार अब्दुल नबी
माननीय मंत्री - अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन


श्री. अनुप कुमार, भा.प्र.से.
अपर मुख्य सचिव (सहकार व पणन)


डॉ. प्रवीणकुमार देवरे, भा.प्र.से.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

423423 -A A +A English

प्रशिक्षण

About Us

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचे मार्फत शेतकरी उत्पादक संस्था व प्राथमीक कृषी पत संस्था यांचेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम खालील विषयावर आयोजित करण्यात येतात :-

• शास्त्रीय साठवणुकीची कार्यपध्दती
• गोदाम बांधणी व व्यवस्थापन
• लेखा कार्यपद्धती,
• गोदामांचे शास्त्रशुध्द बांधकाम,
• कृषी मूल्य साखळी व्यवस्थापन इ.
• केंद्र सरकारच्या गोदामा संबधातील विविध योजनांची संपुर्ण माहिती
• यशस्वी शेतकरी उत्पादक संस्था यांचेकडील विविध व्यवसायीक प्रकरणांचा अभ्यासाचे चर्चासत्र

आता पर्यत दोन प्रशिक्षण कार्यक्रम माहे फेब्रुवारी 2021 व माहे ऑगस्ट 2021 या महिन्यात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित यांचेमार्फत निवड करण्यात आलेल्या PACs संस्थाचे प्रतिनिधी व आत्मा यांचेमार्फत निड करण्यात आलेल्या FPC & CBO यांचे प्रतिनिधी करिता आयोजित करण्यात आले.

वरील प्रशिक्षण वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले. सदरचे प्रशिक्षण स्मार्ट या महाराष्ट्र शासन व जागतिक बँकेच्या प्रकल्प अंर्तगत आयोजित करण्यात येतात. 

 अधिक माहितीसाठी :-

नोडल अधिकारी :-  महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, ५८३/ब मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे – ४११०३७

दूरध्वनी क्रमांक :-  +९१ ०२० २४२०६८००, +९१ ०२० २४२६२९५१

इमेल         :-   smart.nodal@mswc.in, info@mswc.in

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आपल्या प्रशिक्षित आणि अनुभवी गुणवत्ता नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या मदतीने गोदामात साठविलेल्या शेतमालाची काळजी घेण्यात येते. गोदामात ठेवलेल्या साठ्याचा नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित धोक्यांपासून विमा उतरवला जातो. बऱ्याचदा, बाजाराच्या गरजेशी जुळण्यासाठी आणि अधिक चांगल्या किंमतीसाठी, शेतमालाची स्वच्छता आणि सुधारणा करणे आवश्यक असते. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेता वखार महामंडळाने राज्यभरातील निवडक वखार केंद्रावर क्लिनिंग व ग्रेडींग यार्डची इतर सुविधेसह स्थापना केली आहे. तसेच प्रत्येक वखार केंद्रावर धान्याची तपासणी करणेसाठी लागणारी प्रयोगशाळा स्थापन केल्या आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मुळ उत्पादक शेतकऱ्यांना गोदाम भाड्यामध्ये ५०% सूट देते आणि शेतकऱ्यांचा शेतमाल साठवणीकीकरिता गोदामात २५% जागा राखीव ठेवली जाते .तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या यांना मुळ वखार भाड्यामध्ये २५% सवलत देते.

साठवणुक केलेल्या मालावर महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या पराक्रंम्य वखार पावतीचा वापर करून शेतकरी आणि व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात तारण कर्ज सुविधेचा लाभ घेतला आहे. माहे एप्रिल २०२० ते मार्च -२०२१ या कालावधीत ५३९३७ वखार पावत्यांवर रू.१९३९ कोटीचे तारण कर्ज वितरीत करण्यात आले आहे. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या तारण कर्ज सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. या आर्थिक वर्षात माहे जून -२०२१ पर्यंत रू.७९.५९ कोटीचे तारण कर्ज शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बँके मार्फत लाभ देण्यात आला आहे. ईलेक्ट्रोनिक पद्धतीने वखार पावती (E-NWR)वितरीत करण्याची आणि तारण कर्ज देण्याची प्रक्रिया आता ब्लॉक-चेन तंत्रज्ञानाचा वापर करून वखार महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.