कंटेनर फ्रेट स्टेशन(CFS) वखारगृहे

महामंडळाचे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, द्रोणागिरी नोड, न्हावाशेवा येथे अत्याधुनिक कंटेनर फ्रेट स्टेशन असून त्याव्दारे एका छताखाली आयात-निर्यातदारांसाठी सेवा उपलब्ध आहेत. हे कंटेनर फ्रेट स्टेशन खालिल प्रमाणे तिन भागात विभागलेले आहे.

    १. निर्यात गोदाम : ३६०० स्के.मी. आच्छादित क्षेत्र.
    २. आयात गोदाम : २५२५ स्के.मी. आच्छादित क्षेत्र.
    ३.  शुल्कबंध (Bonded) गोदाम : ३३३३ स्के.मी. आच्छादित क्षेत्र.

 

  • कंटेनरच्या वाहतुक व साठवणुकी करीता २१,००० स्के.मी. चे विस्तीर्ण क्षेत्र.
    संपुर्ण संगणकीकृत व्यवहार नोंदी.
  • शिपिंग लाइन्स एजेंट व CHA करीता आवश्यक सुविधांसह पुरेसे कक्ष.
  • निर्यात गोदामाचे माध्यमातून LCL व FCL या दोनही प्रकारे मालाची जावक केली जाते.
  • आयातदारांसाठी शुल्कबंध (Bonded) गोदामाची सुविधा.
  • परिसर हाय मास्क , फ्लड लाइट , सी.सी.टी. व्ही. कॅमेरे, अग्निक्षमन यंत्रणा इ. व्दारा सुरक्षित.
  • २४ तास अखंड पाणी व विज पुरवठा.२१,०००
  • आयात / निर्यात माल कंटेनर मधुन काढणे / मध्ये माल भरणे करीता प्रशस्त जागा.
  • अंगभूत अग्निशमन यंत्रणा तसेच स्वतंत्र अग्निशामक यंत्र दिले आहेत.
  • पॅलेटिझिंग, लॅशिंग, कंटेनर साफ करणे, कंटेनरची धुलाई करणे यासारख्या संबद्ध सेवा गुणात्मक सेवा वाजवी दरासह प्रदान केल्या जातात.
  • घरगुती परीक्षा आणि ईडीआय सुविधा.
  • कंटेनर टॉप लिफ्टर / बेलोटी, विविध क्षमता फोर्कलिफ्ट्स, क्रेन यासारखी सेवा योग्य आणि कंडिशंड मटेरियल हँडलिंग उपकरणे.
  • सीएफएसमध्ये ट्रेलर आणि हँड ट्रॉली प्रदान केल्या जात आहेत. म.रा.व.मं व्यापारानुसार त्वरित सेवा देण्याची योजना आखली आहे.
  • दस्तऐवजीकरण, बिलिंग आणि लेखा आवश्यकतांसाठी एक खिडकी क्लीयरन्स अंतर्गत 24 तास सेवा.