आमच्या विषयी
About Us
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा शासनाचा उपक्रम असून, राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माण करुन कृषी व औद्योगीक क्षेत्रास साठवणुक सुविधा पुरविण्यासाठी महामंडळाची निर्मीती केलेली आहे. महामंडळाची स्थापना ८ ऑगस्ट १९५७ ला “ॲग्रिकल्चर प्रोडयूस (डेव्हलपमेंट ॲण्ड वेअरहाउसिंग) कॉर्पोरेशन ॲक्ट १९५६” अन्वये झालेली आहे. सन १९६२ मध्ये “द वेअरहाउऊसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२” पारित झाल्यानंतर, १९५६ चा कायदा रद्द झाला असून आता हे महामंडळ १९६२ च्या कायद्यान्वये कार्यरत आहे.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने शेतक-यांना आर्थिक सेवा देण्यासाठी उपाय योजना सुरू केल्या आहेत. त्यांचे प्राथमिक उत्पादन साठवण्यासाठी. म.रा.व.महामंडळ वैज्ञानिक साठवण सुविधांचा लाभ घेण्यासाठी त्यांना 50% पर्यंत सूट देऊन प्रोत्साहित करते. एससी / एसएसटी अधिसूचित आदिवासी शेतक-यांना 50% पर्यंत सूट दिली जाते.
महामंडळाचे गोदामात साठवणुकीस ठेवलेल्या मालासाठी देण्यात येणारी वखारपावती ही परक्राम्य लेख (Negotiable Instrument) असल्याने , वखार पावतीवर विविध बॅंकाकडून तारण कर्ज दिले जाते. त्या आधारे शेतकऱ्यांना काढणीपश्चात तातडीच्या आर्थिक गरजा बँकेकडून अर्थ साहाय्य घेऊन पुर्ण करता येतात व नंतर योग्य बाजारभाव येईपर्यंत गोदामांत सुरक्षित साठवणुकीची सोय मिळते.


