श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री


श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री


डॉ. राजगोपाल देवरा, भा.प्र.से.
अपर मुख्य सचिव (सहकार व पणन)


श्री. कौस्तुभ दिवेगावकर, भा.प्र.से.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

423423 -A A +A English

तारण कर्ज

About Us

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे शेतकरी हिताचे निर्णय आणि शेतकरी समर्थक धोरणे राबवून शेतकरी समुदायाला लाभ करुन देत आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकांकडून शेतकऱ्यांना वखार पावतीवर तारण कर्ज मिळवून देतात त्यामुळे शेतकऱ्यांना पडक्या भावाने शेतमालाची विक्री करावी लागत नाही. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या गोदमात शेतमाल साठवण केल्यावर शेतकऱ्यांना मिळणारी वखार पावती गहाण ठेऊन किफायतशीर दराने तारण कर्ज सहज उपलब्ध होते.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे शेतकरी हिताचे निर्णय आणि शेतकरी समर्थक धोरणे राबवून शेतकरी समुदायाला लाभ करुन देत आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकांकडून शेतकऱ्यांना वखार पावतीवर तारण कर्ज मिळवून देतात त्यामुळे शेतकऱ्यांना पडक्या भावाने शेतमालाची विक्री करावी लागत नाही. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या गोदमात शेतमाल साठवण केल्यावर शेतकऱ्यांना मिळणारी वखार पावती गहाण ठेऊन किफायतशीर दराने तारण कर्ज सहज उपलब्ध होते.

शेतमाल तारण योजना कार्यपध्दती

1. शेतकरी नोंदणी
• शेतकरी महामंडळाच्या गोदामास भेट देईल त्यावेळेस महामंडळाचा फार्म नं.6 चा अर्ज गोदाम धारकास भरून देईल.
• फार्म नं.6 मध्ये मालाचे वर्णन, मालाचा दर्जा/प्रत, वजन, ठेवीदाराचे नांव, पत्ता पोत्यांची संख्या, माल ठेवलेल्या दिवशीचा बाजार भाव इत्यादी माहिती सादर करेल.
• याव्यतिरीक्त महत्वाची KYC कागदपत्रे गोदाम धारकास सादर करेल.
2. वखार/गोदामात मालाची साठवणूक
• महामंडळाच्या गोदामात प्राप्त झालेला माल व फार्म नं. 6 मधील माहिती याची गोदाम धारक पडताळणी करेल.
• त्यानंतर वखार महामंडळाचा गोदाम धारक ठेवीदाराचे नांव. प्राप्त मालाचे वर्णन, पोत्यांची संख्या, मालाचे वजन, गुणवत्ता व प्रचलित कृ.उ.बा.समितीच्या दरानुसार मालाची किंमत इत्यादी बाबी गोदाम पावतीवर नमूद करेल व ठेवीदारास गोदाम पावती देईल.
3. तारण कर्ज अर्ज प्रक्रिया
• शेतकरी ठेवीदारास साठवणुक मालावर तारण कर्ज घेण्याचे असेल तर असा शेतकरी गोदाम धारकाकडून प्राप्त झालेली गोदाम पावती घेऊन ठेवीदार त्यास ज्या बँकेकडून तारण कर्ज घेणेचे आहे अश्या बँकेकडे गोदाम पावती सादर करेल.
• संबधीत बँक प्राप्त झालेली गोदाम पावती त्यामधील नमूद मालाचे वर्णन, वजन, प्रचलित किंमत लक्षात घेऊन तसेच संबधित कर्ज अर्जदार याची बँकेच्या नियमानुसार पात्रता ठरवेल.
• संबधित शेतकरी ठेवीदार तारण कर्ज मंजूर करण्यास प्रात्र असल्यास अश्या अर्जदारास वखार पावतीवरील नमूद मालाच्या किंमतीच्या 60% ते 70% कर्ज मंजूर करीत असते, असे कर्ज बँक निहाय वेगवेगळ्या व्याज दराने वितरीत करण्यात येते.

4. कर्ज मंजूरीची बॅक स्तरावरील प्रक्रिया
• बँकचे अधिकारी ठेवीदाराचे प्राप्त झालेले KYC कागदपत्रे व ठेवीदाराची गोदाम पावती याची छानणी करून व ठेवीदाराची बँकेच्या नियमानुसार तारण कर्जासाठीची पात्रता ठरवून कर्ज वितरीत करीत असतात.
• ठेवीदार शेतकरी तारण कर्जासाठी पात्र असल्यास त्यास तारण कर्जाच्या विविध कागद पत्रांची पुर्तता बँक अटी व शर्तीनुसार करावी लागते. तसेच प्रत्यक्ष तारण कर्ज वितरीत होणेपुर्वी ठेवीदार कर्जदारस गोदाम पावतीवर तारण रक्कमेची नोंद/बोजा गोदाम धारकाकडून नमूद करून घ्यावा लागतो.
• त्यानंतर बँक अधिकारी शेतकरी ठेवीदार यांच्या बँक खात्यावर तारण कर्जाची रक्कम वर्ग करतात.
5. कर्ज परतफेड व मालाची जावक
• ठेवीदार शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम बँकेस परतफेड केलेनंतर बँक गोदाम पावतीवरील कर्जाची नोंद/बोजा रद्द करणेबाबत रीतसर गोदाम धारकास ना-हरकत प्रमाणपत्र देतात.
• त्यानंतर संबधित ठेवीदार आपल्या गोदाम पावतीवरील नमूद माल गोदामाचे भाडे अदा करून त्रयस्थ पक्षकारास विक्री अथवा हस्तांतरीत करू शकतो.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आपल्या प्रशिक्षित आणि अनुभवी गुणवत्ता नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या मदतीने गोदामात साठविलेल्या शेतमालाची काळजी घेण्यात येते. गोदामात ठेवलेल्या साठ्याचा नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित धोक्यांपासून विमा उतरवला जातो. बऱ्याचदा, बाजाराच्या गरजेशी जुळण्यासाठी आणि अधिक चांगल्या किंमतीसाठी, शेतमालाची स्वच्छता आणि सुधारणा करणे आवश्यक असते. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेता वखार महामंडळाने राज्यभरातील निवडक वखार केंद्रावर क्लिनिंग व ग्रेडींग यार्डची इतर सुविधेसह स्थापना केली आहे. तसेच प्रत्येक वखार केंद्रावर धान्याची तपासणी करणेसाठी लागणारी प्रयोगशाळा स्थापन केल्या आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मुळ उत्पादक शेतकऱ्यांना गोदाम भाड्यामध्ये ५०% सूट देते आणि शेतकऱ्यांचा शेतमाल साठवणीकीकरिता गोदामात २५% जागा राखीव ठेवली जाते .तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या यांना मुळ वखार भाड्यामध्ये २५% सवलत देते.

साठवणुक केलेल्या मालावर महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या पराक्रंम्य वखार पावतीचा वापर करून शेतकरी आणि व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात तारण कर्ज सुविधेचा लाभ घेतला आहे. माहे एप्रिल २०२० ते मार्च -२०२१ या कालावधीत ५३९३७ वखार पावत्यांवर रू.१९३९ कोटीचे तारण कर्ज वितरीत करण्यात आले आहे. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या तारण कर्ज सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. या आर्थिक वर्षात माहे जून -२०२१ पर्यंत रू.७९.५९ कोटीचे तारण कर्ज शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बँके मार्फत लाभ देण्यात आला आहे. ईलेक्ट्रोनिक पद्धतीने वखार पावती (E-NWR)वितरीत करण्याची आणि तारण कर्ज देण्याची प्रक्रिया आता ब्लॉक-चेन तंत्रज्ञानाचा वापर करून वखार महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.

संपर्क साधा

9 + 5 =

मुख्य कार्यालय

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

583 / ब, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे – ४११०३७

महाराष्ट्र, भारत.

+९१ ०२० २४२०६८००, +९१ ०२० २४२६२९५१

+९१ ०२० २४२०६८२९, ३९, ४९

mswcinfo@mswarehousing.com

info@mswc.in